-2.3 C
New York

Vijay Wadettiwar : बीडमध्ये धनंजय बोले… पोलीस दल हाले’, विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप…

Published:

बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेवर हल्लाबोल केलाय. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, बीडमध्ये धनंजय बोले पोलीस दल हाले, अशी परिस्थिती आहे. एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या (Dhananjay Munde) शब्दापलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे खून झाला तरी आकस्मित नोंद होईल. पोलिसांनी तो आदेश इमानदारीने पाळला, याचं दुःख असल्याचं वडेट्टीवार (Walmik Karad) म्हणाले आहेत.

वाल्मीक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच असल्याची टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. ते म्हणाले की, वाल्मिक कराडला खुणांच्या गुन्ह्याखाली अटक करून पोलिसांना सगळे धागे दोरे शोधायचे असेल. तळात जायचं असेल (Maharashtra Politics) तर, एक महिन्याचा पीसीआर घेतला पाहिजे. एका वर्षात 110 पेक्षा जास्त खून होतात. ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई दिसत नाही. मुख्यमंत्री बोलतात दोषींना सोडणार नाही, पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता महाराष्ट्राचा जो बिहार झाला आहे, तो संपवण्याची दिसत नाही.

समलैंगिक विवाह नाही म्हणजे नाहीच; पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

वडेट्टीवार म्हणाले की, जोपर्यंत वाल्मिक कराडवर खुणाचा गुन्हा दाखल होत नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही. वाल्मीक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचा असं देखील विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. त्याचसोबत त्यांनी बीडमधील पोलीस दलावर धनंजय मुंडे यांचं नियंत्रण असल्याचं देखील बोललंय.

बीडसोबतच वडट्टेवारांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील भाष्य केलंय. पुण्यात देखील कायद-सुव्यवस्था उध्वस्त झालीय. मी कोणाच समर्थन करत नाही. किंवा कोणाविरोधात बोलत नाही. पोलीस आयुक्तांची ती जबाबदारी आहे. खुणाच्या घटना वाढल्या, ड्रग्ज विक्री वाढली. कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. गुंड बाहेर येऊन स्वतःची मिरवणूक काढून घेतात. अजित पवारांना स्वतःचा माणूस आणायचा असेल तर त्याला राजकीय स्वरुप न देता पुण्यामध्ये एक कडक शिस्तीचा पोलीस कमिशनर आणला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img