राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांची आज 125 वी जयंती आहे, या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात आज अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज चंद्रपूरात दाखल झाले.त्यावेळी त्यांनी चंद्रपूरचे दैवत माता महाकाली मंदिरात त्यांनी दर्शन घेतले.यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘महसुलात चोरी होत आहे. राज्याचा महसूल राज्याला कसा मिळेल यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. विरोधी पक्षाचे कामच असतं टीका करणे ते करत राहतात’ असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पद न मिळाल्याने ते नाराज आहेत. आज चंद्रपुरात झालेल्या कार्यक्रमात देखील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे गैरहजर असल्याचं दिसून आलं. यावर ते नाराज असल्याने आले नाहीत. अशी चर्चा सुरु आहे. यावर बोलताना, ‘स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी मला फोन केला होता, वैयक्तिक कारणामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते’ असं म्हणत मुनगंटीवार नाराज असलेल्या चर्चाना पूर्ण विराम दिला तर,’प्रत्येकजण प्रत्येक वेळी उपस्थित राहिलं असं नाही. आमच्यात कोणताही वाद नाही किंवा कोणीही नाराज नाही.” असं देखील विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.