मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ येथे राज्यातील १९ महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये मेट्रो, महामार्ग, सिंचन, विमानतळ, बंदरे, आणि पर्यटन यासारख्या प्रकल्पांचा समावेश होता. मुख्यमंत्री फडणवीस यांची वॉर रूम आता सक्रिय झाली आहे. १९ प्रकल्पासंबंधी आदेश एका दिवसात त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले, प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबांवर कठोर पावले उचलणे, कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही, आणि त्यासाठी जबाबदार विभागांना उत्तरदायी धरले जाईल आणि आवश्यकतेनुसार तातडीची पावले उचलली जातील. प्रकल्पांच्या प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, भूसंपादन, आणि अंमलबजावणी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांवर प्रभावीपणे काम करण्याचे त्यांनी आदेश दिले.
Devendra Fadnavis मुख्यमंत्री यांनी विभागांना दिलेले पुढील निर्देश
वाढवण बंदर : सागरी व्यापाराला देशाच्या चालना देण्यासाठी वाढवण बंदर उभारणीच्या परवानग्या व महाराष्ट्राच्या औद्योगिक व निर्यात धोरणाला भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश यामुळे प्रोत्साहन मिळणार.
विदर्भ आणि मराठवाडा सिंचन प्रकल्प
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेसाठी सोमवारी कार्यादेश देण्यात यावे.
लोअर पेढी प्रकल्पग्रस्तांना तातडीने जागा उपलब्ध करावी याप्रकल्पामुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढवून जलस्रोत व्यवस्थापन सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
वडसा – गडचिरोली आणि वर्धा – नांदेड रेल्वे मार्गाचे भूसंपादन जलद पूर्ण करण्यात यावे.
तुळजापूर मंदिर विकास आराखडा मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा.
विरार – अलिबाग मल्टी मॉडेल कॅरिडोरचे सर्वेक्षण पुढील महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश.
मुंबई मेट्रो ३ प्रकल्प जून-जुलैपर्यंत पूर्ण करावा.
पालघर विमानतळासाठी सल्लागाराची नेमणूक करावी
वाहतूक समस्यांवर उपाय पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यात यावी.
तुळजाभवानी मंदिर सुशोभीकरणाद्वारे यात्रेकरूंसाठी अधिक सुविधा निर्माण करणे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच प्रकल्पांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुळा-मुठा नदी संवर्धन जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करणे.