-2.2 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांचा गट सत्तेत जाणार? स्वतःच खुलासा करत म्हणाले

Published:

राज्याच्या राजकारणात कालपासून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. तटकरेंनी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आमच्यासोबत या अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. खुद्द तटकरे यांनी मात्र आपण कुणाशीच संपर्क केला नसल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीने राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू असे शरद पवार म्हणाले आहेत. मुंबई शहरात आयोजित पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, आपला पक्ष सत्तेत जाणार या फक्त अफवाच आहेत. आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू. पुढील पंधरा दिवसांत तुम्हाला संघटनेत मोठे बदल पहायला मिळतील. 1999 मध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आजही निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी आणि गमावण्यासाठीही काही नाही असे शरद पवार म्हणाले. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाऊ असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar खासदारांना कुणी संपर्क केला, नाव समोर

अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याची चर्चा आहे. परंतु, खासदार अमर काळे यांनी वेगळ्याच नेत्याचं नाव घेतलं. सोनिया दुहान या शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क करत होत्या असा दावा काळे यांनी केला आहे. या प्रकाराची माहिती सुप्रिया सुळे यांना दिल्याचेही खासदार अमर काळे यांनी सांगितले.

Sharad Pawar सर्व खासदार आमच्यासोबत : आव्हाड

ज्या खासदारांना फोन आले होते त्यातील कुणाशी तुमचं बोलणं झालं आहे का असे विचारले असता आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझं एका खासदाराशी बोलणं झालं आहे. पण इतकंच सांगतो की त्यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केला होता. आमचे खासदार शंभर टक्के आमच्याबरोबरच आहेत याबद्दल माझ्या मनात कोणताच संशय नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img