-2.2 C
New York

Pune : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, पोलिस निरीक्षकांचे आदेश

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.९ जानेवारी ( रमेश तांबे )

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी सांगितले.ओतूर पोलीस ठाण्याच्या वतीने अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ओतूर ( ता.जुन्नर ) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ( ता.जुन्नर ) येथील बाजार समितीच्या आवारात ओतूर पोलीसांच्या वतीने,वाहन चालकांची बैठक घेऊन त्यांना वाहतुकीचे नियम व नवीन दंड आकारणी याबाबत श्री थाटे यांनी माहिती देऊन जनजागृती केली.

गेल्या काही महिन्यांमध्ये अहिल्यानगर माळशेज मार्गे कल्याण या महामार्गावर ओतूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या ओतूर पोलीस ठाण्याअंतर्गत हद्दीत मोठ्या प्रमाणात अपघात होत असून,या अपघातामध्ये मालवाहतूक पिकअपची संख्या मोठी होत असून याच पार्श्वभूमीवर ओतूर पोलीस ठाण्याकडून पिकअप चालक-मालक व इतर वाहान चालक यांची बैठक घेऊन वाहतूक नियमा बाबत जनजागृती केली.


यावेळी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, दुचाकीवर हेल्मेट वापरावे,सोबत लायसन बाळगावे,धोकादायक रित्या वाहन चालू नये,धोकादायक रित्या मालाची वाहतूक ही करू नये,सीट बेल चा वापर करावा,ट्रिपल सीट वाहन चालवू नये,वाहनाचे इंडिकेटर वगैरे सुस्थितीत ठेवणे,वाहनाचे क्रमांक फलक आरटीओ नियमानुसार असावे,वाहनाचे इन्शुरन्स व पि यु सी काढणे,रहदारीस अडथळा होईल अशी वाहने लावू नये,ब्लॅक फिल्मिंग करू नये,कर्कश हॉर्न वापरू नये,मध्य प्राशन करून वाहन चालवू नये सुचना यावेळी थाटे यांनी दिल्या.तसेच वाहन चालकना वाहतुकीचे नियम पाळावे तसेच नवीन दंड प्रणाली याबाबत माहिती देण्यात आली तसेच जीवन अनमोल असून अपघात टाळण्यासाठी आपण वेगाने नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे यावेळी थाटे यांनी आवाहन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे, ज्येष्ठ आडतदार बाळासाहेब होनराव, भगवान घोलप, दत्तात्रय डुंबरे,संतोष होनराव, सिकंदर मोमीन, संदीप घुले, योगेश शेटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, पोलीस हवालदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, शामसुंदर जायभाये मोठ्या प्रमाणात वाहन चालक व पिकअप मालक व चालक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img