0.4 C
New York

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं कारण काय ?

Published:

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून राज्यातील, मुंबईतील प्रश्न त्यांच्यासमोर मांडत राहणार असल्याची प्रतिक्रिया दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर आज पुन्हा आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले.

यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून आणि खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक केले होते. यानंतर आता शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शिवसेना ( ठाकरे गट ) आणि फडणवीसांमध्ये नक्की चाललंय काय? अशी राजकीय चर्चा रंगली आहेत. याबद्दल आदित्य ठाकरे यांनी स्वत:चं स्पष्टीकरण दिलं आहे. ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Aditya Thackeray आदित्य ठाकरे काय म्हणाले?

वरळीत राहणाऱ्या पोलीस पत्नी आणि गृहनिर्माणबाबत फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. पोलीस निवासात राहणाऱ्या निवृत्त पोलिसांना दंड लावला आहे, तो पर स्केवर फूट 20 रुपयांचा दर 150 रुपये केला आहे. तो कमी करावा अशी विनंती फडणवीसांकडे केल्याचं ते म्हणाले. पोलिसांच्या अनेक पिढ्यांनी मुंबईची सेवा केली आहे. निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरं कशी देता येतील त्याबाबत चर्चा केली. शिवाय मुंबई पोलिसांची निवासस्थानं आहेत त्यांच्या डागडुजीचा प्रश्न फडणवीसांसमोर मांडल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

सर्वांसाठी पाणी ही योजना आम्ही आणली होती. कोणत्याही सोसायटीचं लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी मिळणं हे हक्काचं आहे, सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईत लागू करावी, त्यावरील स्थगिती हटवावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे केली. टोरेस घोटाळ्याप्रकरणी कारवाईची मागणीही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्‍यांकडे केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img