-4.8 C
New York

Pune Ring Road : लवकर पुण्यातील बहुचर्चित रिंग रोडचे काम सुरू होणार

Published:

लवकर पुण्यातील बहुचर्चित रिंग रोडचे (Pune Ring Road) काम सुरू होणार आहे. दोन-तीन दिवसात पुण्यातील रिंग रोड संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीबैठक होणार आहे. पुणे शहरा भोवती साकारण्यात येणाऱ्या रिंग रोडसाठी पश्चिम भागात 96% जमीन संपादित झाली आहे. एका बाजूने त्यामुळे लवकरच काम सुरू करण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची पुण्यातील रिंग रोडसाठी लवकरच आढावा बैठक होणार आहे. त्याबैठकीनंतर रिंग रोडचं भूमिपूजन कधी होणार? हे निश्चित होणार आहे. लवकरच भूमिपूजन होऊन त्यामुळे रिंग रोडचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र ड्युटी याबाबत मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

खासदारांना फोडण्याचा अजित पवारांचा प्रयत्न; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त

169 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा, रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहेत. 90% पेक्षा जास्त प्रमाणात रिंग रोडसाठी आवश्यक पश्चिम भागात जमीन संपादित झाला आहे. रिंग रोड भूमिपूजनाचा मुहूर्त नवीन सरकार आलं, खाते वाटप झाले, मात्र लागत नसल्याने रिंग रोडचा प्रकल्प प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे, त्यावर टीका टिपणी होते.

पुण्यासाठी महत्त्वाचा असणारा रिंग रोडमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी पूर्व भागात 82 टक्के भूसंपादन झाले असून 18% संपादन बाकी आहे. पश्चिम भागाच्या 9% भूसंपादन झाल्याने चार टक्के संपादन बाकी आहे, त्याची काम सुरू आहेत. मुख्यमंत्री येणाऱ्या आढावा बैठकीत यावर निर्णय घेतील आणि भूमिपूजन कधी करायचे, हे निश्चित करतील. याबाबतच्या अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img