-4.8 C
New York

Marathi Language : मराठी भाषेला अधिकृत अभिजात दर्जा; सावंतांच्या हाती आला शासन आदेश

Published:

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, शासन आदेश घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा निघाला नव्हता. मराठी भाषेला अभिजात दर्जा आज अखेर मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. शासन आदेशाची प्रत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांच्याकडून उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

Marathi Language शासन आदेश हाती पडताच काय म्हणाले सावंत?

मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून जाहीर केल्यानंतर त्याबाबतचा शासन आदेश मंत्री उदय सामंत यांना सुपुर्द करण्यात आला आहे. त्यानंतर सामंती यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी याबाबतचा शासन आदेश काढल्याबद्दल आभार मानले. तसेच मराठी भाषिकांचे आणि मराठी जनतेची जे स्वप्न होते ते आज अधिकृतरित्या पूर्णत्वास आले आहे. यावेळी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे फायदे मिळतात ते मिळवण्यासाठी पुढील काही दिवसात याबाबतचा प्रस्ताव मांडणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.

Marathi Language कोणते फायदे मिळणार ?

केंद्र सरकारकडून भाषा समृद्धीसाठी २५० ते ३०० कोटींचे अनुदान
भाषेतील दोन विद्वानांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार
सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना
भाषेच्या अभ्यासासाठी प्रत्येक विद्यापीठात विशेष केंद्राची उभारणी
भारतातील ४५० विद्यापीठांत मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था होणार.
प्राचीन ग्रंथांचा अनुवाद होणार

Marathi Language अभिजात दर्जा म्हणजे काय?

आतापर्यंत देशातील सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला.
तामिळ भाषेला सन २००४ मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
त्यानंतर संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगू (२००८), मल्याळम (२०१३), ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा

Marathi Language राष्ट्रपतींना एक लाख पत्रे

लवकर अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी पत्र मोहिम राबवून राष्ट्रपतींना एक लाख पत्रे पाठवण्यात आली. केंद्र शासनाकडे या प्रस्तावाबाबत सर्व स्तरावरुन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पंतप्रधानांना मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्‍यांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजीच्या पत्रानुसार विनंती केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img