घरांच्या विक्रीच्या बाबतीत मागील 12 वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. (House Sale Increased in Big Cities) देशातील 8 मोठ्या शहरांत सन 2024 मध्ये घरांच्या विक्रीत 7 टक्के वाढ झाली आहे. एकूण 3 लाख 50 हजार 613 घरांची विक्री 2024 मध्येझाली आहे. रियल इस्टेट कन्सल्टंट अनारॉक संस्थेने मागील महिन्यात एक अहवाल जारी केला होता. मंगळवारी एका ऑनलाईन बैठकीत नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी शिशिर बैजल यांनी सांगितलं की भारतीय रियल इस्टेट बाजारात 2 ते 5 कोटी रुपये किमतीच्या घरांची मागणी खूप जास्त आहे.
हैदराबाद आणि पुणे शहरांनी नवीन उच्चांक गाठला आहे. तर मुंबई (Mumbai) शहराने मागील 12 वर्षांतील सर्वात विक्रमी रेकॉर्ड नोंदवले आहे. जास्त किमतीच्या घरांची विक्री चांगली राहिली. 2 ते 5 कोटींच्या घरांच्या विक्रीत प्रती वर्षी 85 टक्क्यांची वाढ दिसून आली. 50 लाखांपेक्षा कमी आणि 50 लाख ते 1 कोटींच्या दरम्यान असणाऱ्या घरांच्या विक्रीत मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे.
सन 2020 नंतर रेसिडेंनशियल मार्केटमध्ये जोरदार वाढ झाली आहे. 2024 मध्ये या क्षेत्रातील विक्रीत 12 वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. बैजल यांच्या म्हणण्यानुसार प्रीमियमायजेशन ट्रेंड वाढीस लागला आहे. याचं कारण म्हणजे बाजार आता जास्त किमतीच्या घराकडे वळला आहे. लोकांचे लाईफस्टाईल गरजा पूर्ण करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. हा बाजार पुढील वर्षातही चांगली कामगिरी करू शकतो.
सर्वसामान्य माणसांसाठी मुंबईत घर घेणं आता अशक्य कोटीतील गोष्ट झाल्याचं आपण म्हणतो ते खरंही आहे. पण, दोन ते पाच कोटींच्या किंमती असणाऱ्या घरांची खरेदी वाढली आहे. लोकांचे उत्पन्न आणि राहणीमानात सुधारणा झाल्याचे यावरून दिसून येत आहे. आताही घरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबईसह देशातील अन्य मोठ्या शहरांत हे प्रमाण जास्त दिसून येत आहे.