उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती
उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज होणार
दिल्ली : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या समितीला कायदा आणि न्याय मंत्रालयाचे अधिकारी माहिती देतील. जेपीसीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांनी ही बैठक बोलावली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलगोबीच्या शेतात फिरवला रोटावेटर
फुलगोबीला दर मिळत नसल्यानं खर्चही निघत नाहीय. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने २ एकर शेतीवर रोटावेटर फिरवला. फुलगोबीला एक ते दोन रुपये किलो असा भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त झाला आहे.
सिंहगड रस्त्याला भीषण अपघात महिला गंभीर जखमी
सिंहगड रस्ता, ता. 8 : मुख्य सिंहगड रस्त्याला भा. द. खेर आनंदनगर चौकात झालेल्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. विठ्ठलवाडी कडून माणिकबागच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी आणि पिकअप ( ट्रक) यांच्यात मोठी धडक बसली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला डोक्याला दुखापत झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज जळगाव दौऱ्यावर
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर
कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या 33 व्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती राहणार आहे