-4.8 C
New York

Supriya Sule : खासदारांना फोडण्याचा अजित पवारांचा प्रयत्न; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त

Published:

शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू झाल्याचा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शरद पवार यांच्या सात खासदारांना(Sunil Tatkare) सुनील तटकरे यांनी संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सुनील तटकरे यांनी सात खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर देखील दिल्याची माहिती आहे. संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांचे ऑफर नाकारल्याची माहिती देखील आहे.तटकरे यांच्या बाबतची नाराजी दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करत व्यक्त केल्याची माहिती आहे. (Supriya Sule) राजकीय वर्तुळात यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आले होते. तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फक्त 1 खासदार तेही सुनील तटकरेंच्या निमित्तानं निवडून आला होता. यातच सुप्रिया सुळे वगळता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 7 खासदारांच्या वैयक्तिक भेटी घेऊन सुनील तटकरे यांनी साधला. ‘तुम्ही सत्तेसोबत या. तसेच, तटकरेंनी या भेटीची किंवा ऑफरची माहिती बाहेर कुणाला देऊ नका,’ असं खासदारांना सांगितल्याचं बोललं जातं.

पक्षातील नेत्यांना आणि सुप्रिया सुळे यांना मात्र, सातही खासदारांनी याची माहिती दिली. तटकरेंच्या या कृतीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते, प्रफुल्ल पटेल यांना फोन करून तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘पुन्हा आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न का करत आहात?’ असा संतप्त सवाल सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना विचारल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, सातही खासदारांनी सुनील तटकरेंची ऑफर धुडकावली आहे. सातही खासदारांना दिल्लीतील केंद्र सरकार स्थिर करण्यासाठी फोडण्याचा प्रयत्न होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img