-2.6 C
New York

Pune : पत्रकार रमेश तांबे यांना “आचार्य बाळशास्त्री जांभेकर भुषण पुरस्कार”प्रदान

Published:

पुणे,दि.७ जानेवारी 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,पिपंरी चिंचवड शहर व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने सोमवारी 

सोमवार  दि.६ रोजी पत्रकार दिनानिमित्त जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रमेश शंकरराव तांबे यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भुषण पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दि.६ रोजी पत्रकार दिनानिमित्त ग.दि.माडगूळकर सभागृह  ( निगडी ) पुणे येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते किरण माने,ABP माझा च्या संपादिका सरिता कौशिक,अभीनेत्री आर्या घारे,शिवसेना नेते इरफान सय्यद,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक, तथा दैनिक जनप्रवास चे संपादक संजयजी भोकरे,प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे,राज्य सरचिटनिस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,जिल्हा अध्यक्ष संजोक काळदंते,जुन्नर तालुका अध्यक्ष भरत अस्वार,,डॉ.सुदाम बिडकर,सदानंद शेवाळे,राजेश डोके आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली २५ वर्षापेक्षा जास्त सामाजिक,राजकीय,शैक्षणिक अशा विविध विषयांवर पत्रकारीता करून रमेश तांबे यांनी समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे.पत्रकार रमेश तांबे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img