फळांचा राजा असलेल्या आंब्याचे सीजन पुढील एक- दीड महिन्यात सुरु होणार. यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्यांची पहिली पेटी आज मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली आहे.या नंतर आता नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या विविध देशातील द्राक्ष दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.चायना येथून द्राक्ष दाखल होताना दिसत आहे. एपीएमसी बाजारात या द्राक्षांची किंमत ही तीनशे रुपये इतकी आहे तर द्राक्षांची दहा ते पंधरा कंटेनर दाखल झाले आहेत.
चायना येथून आलेल्या द्राक्षांना ग्राहकांचा अधिक पसंती मिळत आहे. भारतीय द्राक्षांचे दर हे किलोमागे 120 ते 150 रुपये आहे. परदेशी द्राक्षांचे दर हे किलोमागे 300 रुपये आहे. मात्र परदेशी द्राक्षांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं व्यापारी म्हणत आहेत. काल नवी मुंबईतील बाजारात कोकणातील देवगड येथून केसर आंब्याची पेटी दाखल झाली.