-2.6 C
New York

Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार मतदान !

Published:

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणुक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातत्याने विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावरुन निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रत्येक संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी होतं. दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.

Asaram bapu : मोठी बातमी ! आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीसाठी १७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असून १८ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. २० जानेवारी मतदानाची तारीख असून ५ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि ८ फेब्रुवारीला निकाल स्पष्ट होईल. यंदा भाजप, आप, आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img