आज दुपारी २ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. निवडणुक आयोग दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहेत. येत्या २३ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेतील ७० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्ठात येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर पुढील विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होऊ शकते. 2020 साली निवडणुकीची घोषणा 6 जानेवारीला झाली होती. 8 फेब्रुवारीला मतदान आणि 11 फेब्रुवारीला मतमोजणी झाली होती.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर दिल्लीत आदर्श आचारसंहिता लागू होईल. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजप १० जागा सुद्धा जिंकू शकली नाही. यंदा दिल्लीत तिरंगी सामना होणार असून आम आदमी पार्टी, भाजप आणि कॉंग्रेस अशी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे १८ फेब्रुवारीला सेवा निवृत्त होणार आहेत. त्यामुळे . मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली ही शेवटची निवडणूक असू शकते.