बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे.पण या काळात त्यांना अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूवर २०१३ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सात जणांवर आरोप पत्र देखील दाखल करण्यात आले. न्यायालयाने सहा आरोपींना निर्दोष ठरवत आसाराम बापूंना दोषी ठरवले.
Sanjay Raut : ‘अजित पवार हतबल आहेत, ते नेते नाहीत’, संजय राऊतांचा टोला
सध्या आसाराम बापूला ह्रदयाशी संबंधित आजार आहे.या आधी त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मात्र, आता त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वैद्यकीय उपचारांसाठी राजस्थान उच्च न्यायालयाने सात दिवसांचा पॅरोल दिला होता.१८ डिसेंबर रोजीच सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला १८ दिवसांचा पॅरोल दिला होता. १ जानेवारी रोजी जोधपूर कारागृहात परतल्यानंतर आता पुन्हा एकदा अंतरिम जामीन देण्यात आला आहे.