-0.4 C
New York

Ajit Pawar :अजित पवार कार्यकर्त्यांवर का भडकले? काय घडलं?

Published:

उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बारामतीच्या दौऱ्यावर होते. (Ajit Pawar ) विविध विकास कामांचं उद्घाटन या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील केलं. बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar नेमकं काय घडलं?

एका पेट्रोल पंपाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन अजित पवार यांना दिले जात होते. ते निवेदन घेत त्यानंतर अजित पवारही कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते. मात्र, याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचं म्हटलं. अजून काही नागरिकांनीही त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर तसंच म्हटलं. काहीसे यानंतर अजित पवार हे संतापले आणि म्हणाले, अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला.

Ajit Pawar मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया

काही वेळेला असं होतं की लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार देखील आपण काही तारतम्य न ठेवता थेट हे काम झालंच पाहिजे असा आग्रह करतात. त्यावेळेला एखाद्यावर रागावणं हे सहाजिक आहे. लोकप्रतिनिधी एखादा उलट बोलला तर त्याची बातमी होते. नागरिक पण एखादा बोलला तर त्याची बातमी होत नाही. रागाच्या भरात कदाचित अजित पवार यांनी ते वक्तव्य केलं असावं, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img