-0.4 C
New York

Sharad Pawar : बीडमधील लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण द्या, शरद पवारांचे CM फडणवीसांना पत्र

Published:

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सातत्यानं आवाज उचलत आहेत. या प्रकरणात आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना जीवितास धोका पोहचू नये यासाठी खबरदारी घ्यावी, सुरेक्षाचा आढावा घेऊन त्यांना शासनामार्फत पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शरद पवारांकडून (Sharad Pawar) करण्यात आली आहे. त्यांनी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय.

Sharad Pawar लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, सुरक्षा द्या- शरद पवार

असं असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, असं म्हणत शरद पवारांनी सोशल मीडियावर पत्र शेअर केलं. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे,” असं शरद पवार यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

Sharad Pawar शरद पवारांनी लिहिलेलं पत्र जशाच तसं

मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच श्री. संतोष देशमुख यांचे काही गुडानी अपहरण करून निघृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपीना आणि त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आदोलने उभी राहिली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोशमोर्चा राज्यशासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता, त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img