राज्यात थंडीचा कडाका हळू हळू वाढत आहे. (Weather Update) त्यात दिवसाच्या तापमानात देखील वाढ होत आहे. राज्यात असे असताना आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने हजेरी लावली होती. यानंतर थंडी गायब झाली होती. हवामान विभागाने मात्र, आता थंडीसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली असून हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यतामराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आहे.
हलक्या पावसासोबतच काही ठिकाणी राज्यात दोन दिवसात अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका आणि मध्यम पाऊस पडू शकतो.हवामान विभागाचा अंदाज इतर काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील असा आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात पुढील दोन दिवस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने पालघर, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच ४० ते ४५ किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी अरबी समुद्राच्या नैऋत्येकडील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य-उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हलक्या पावसाच्या (IMD Forecast) सरीहीत्यामुळे नागरिकांना गारठ्यासह कोसळणार आहेत. राज्यातील कमाल आणि कमान तापमानात मागील काही दिवसांपासून चढउतार होत होता, राज्यात थंडीला मागील दोन दिवसांपासून सुरूवात झाली होती. हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुले आणि छत्रपती संभाजीनगरमध्येकोसळण्याची शक्यता आहे.