-0.4 C
New York

HMPV Virus : चीनमधील HPMV विषाणु पार्शवभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

Published:

कोरोनाचा उद्रेक ज्याप्रमाणे चीनमधून झाला होता. (HMPV Virus) आणखी एका विषाणुने त्याचप्रमाणे आता चीनमधूनच डोके वर काढले आहे. या विषाणुचे नाव HPMV म्हणजेच ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (Human Metapneumovirus) असे असून चीनमधील अनेक नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. अनेकांनी या विषाणुची लागण झाल्यामुळे रुग्णालयात गर्दी केल्याचीही माहिती समोर आली आहे. तर, अनेकांचा यामुळे मृत्यू झाला असून लांबच लांब रांगा स्मशानभूमीतही लागल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, हे सर्व वृत्त चीनकडून फेटाळून लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभाग मात्र, हे खरे आहे की खोटे हा दुसरा मुद्दा असला तरी अलर्ट मोडवर आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने चीनमधील HPMV विषाणुचा राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे राज्यात धोका टाळण्यासाठी विश्लेषण केले आहे. डिसेंबर 2024 मध्ये 2023 या वर्षाच्या तुलनेत कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि, नागरिकांनी श्वसनाच्या खबरदारीचा एक भाग म्हणून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये आरोग्य विभागाकडून या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, नागरिकांनी काय करू नये,आरोग्य विभागाकडून याची सुद्धा नियमावली जारी करण्यात आली आहे.

नवीन विषाणू चीनमधून आलेला Human Metapneumovirus (HPMV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. नाहक भीतीचे वातावरण याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून निर्माण करण्याची गरज नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आय एल आय/ सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, असेही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, खोकला किंवा शिंका जेव्हा आपल्याला येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका, असे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img