-0.4 C
New York

Manoj Jarange : जरांगेंना धनंजय मुंडेंबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं!  जरांगेंवर गुन्हा दाखल

Published:

मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते शहरात आक्रमक झाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे शेकडो समर्थक बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. अंजली दमानियांसह जरांगेंवर (Manoj Jarange) गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडेंच्या समर्थकांनी केली आहे. पोलीस ठाण्यासमोर यावेळी ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं. आंदोलकांनी जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात तसंच घोषणा देण्यात आल्या. प्रशासनातील अधिकारी वादाच्या भोवऱ्यात दुसरीकडे व्हॉट्सअप चॅटमुळे अडकल्याचं दिसतंय. तर मनोज जरांगे यांच्या विरोधात संध्याकाळी उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manoj Jarange मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल

काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया? : बीडमध्ये उच्चपदांवर एकाच समाजाचे लोक आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आहे. दरम्यान, यावर बोलताना दमानिया म्हणाल्या की, मी कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू आहे, मात्र तो आळशी आहे, असं मी कुठेही म्हंटलं नाही.माझं वक्तव्य समाजाला चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचं काम केलं.

Manoj Jarange प्रतिक्रिया देताना मुंडे यांचे कार्यकर्ते

नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे? : धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि ते न्यायासाठी लढत आहेत. त्यांना तुम्ही धमक्या देताय. संतोष देशमुख यांचे भाऊ जेव्हा पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आलं. धनंजय मुंडे यांना यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तररस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजालाही त्रास झाला तर घरात घुसून मारायचं. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img