बीपीएससी परीक्षेच्या पेपरफुटीच्या विरोधात कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेल्या जन सूरज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना पाटणा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पीकेवर गांधी मैदानावर बेकायदेशीर आंदोलन केल्याचा आरोप केला आहे. पीके बेकायदेशीरपणे आंदोलन करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याला आता न्यायालयात हजर केले जाणार आहे.
प्रशांत किशोर हे बिहारचे लोक आणि विद्यार्थ्यांसाठी लढत होते. सरकार या एकतेला घाबरली. त्यांच्याविरोधात शारीरिक हिंसा निंदनीय आहे, असं त्यांच्या समर्थकांच म्हणणं आहे. या झडपेनंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांना AIIMS मधून हलवलं आहे. ते त्यांना नौबतपूर येथे घेऊन चालले आहेत.गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले होते. यापूर्वी पाटणा पोलिसांनी प्रशांत किशोरला मध्यरात्री ताब्यात घेतले होते. पहाटे ४ वाजता आमरण उपोषणाच्या ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेतून एम्समध्ये नेले. प्रशांत किशोर यांनी उपचार नाकारले आणि आपण आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
2 जानेवारीला त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आमरण उपोषण सुरु केलं होतं. बिहार लोकसेवा आयोगाची (बीपीएससी) परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले जन सूराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी सोमवारी पहाटे अटक केली. पहाटे चार वाजता पाटणा पोलिसांनी त्यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले. यावेळी जनसुराज पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
कडाक्याच्या थंडीत पाटण्यातील गांधी मैदानात आंदोलनस्थळी प्रशांत किशोर त्यांच्या समर्थकांसह झोपले होते. दरम्यान, पोलिसांनी सर्वांना बळजबरीने उठवले. प्रशांत किशोर यांना जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवण्यात आले. यानंतर पोलिसांनी पीके यांना पाटणा एम्समध्ये नेले. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस त्यांना स्टेजवरून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक उपस्थित आहेत. मात्र, पाटणा पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून बळजबरीने ॲम्ब्युलन्समधून एम्समध्ये नेण्यात आले.