-2 C
New York

AUS vs IND :  टीम इंडिया पु्न्हा फ्लॉप! ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कोरलं नाव’

Published:

सिडनी येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यात टीम इंडियाचा 6 गडी राखून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात पराभव झाला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत हा सामना अगदी सहज जिंकला.तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य दिलं होतं. 4 गडी गमावून कांगारुंनी हे लक्ष्य सहज गाठलं.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गोलंदाजीसाठी आला नाही. त्याचा फटका भारतीय संघाला बसला. नवख्या प्रसिद्ध कृष्णाने 3 बळी घेतले. तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. सिडनीची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. परंतु स्कोर बोर्डवर पुरेशा धावा भारतीय फलंदाजांनी लावल्या नसल्यामुळे ऑस्ट्रेलियानं विजयी लक्ष्य सहज गाठलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह ही मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने यासह एका दशकाची प्रतिक्षा संपवली. बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियाने 2014-2015 नंतर नाव कोरलं. टीम इंडियाचा या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या शर्यतीतूनही पत्ता कट झाला आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण हा निर्णय चुकीचा ठरला. रोहित शर्मा या सामन्यात नव्हता. खराब फॉर्ममुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं होतं. यामुळे संघाचं कर्णधारपद जसप्रित बुमराहकडे देण्यात आलं. पहिल्या डावात भारताने फक्त 185 धावा केल्या. फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. परंतु, गोलंदाजांनी याची भरपाई केली.

AUS vs IND 10 वर्षांची प्रतिक्षा संपली

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात याआधी 4 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात यायची. ऑस्ट्रेलियाने अखेरीस 2014-15 साली मायदेशात टीम इंडियावर 2-1 अशा फरकाने मात करत मालिका जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने सलग 3 वेळा या 2-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली. मात्र यंदापासून या मालिकेत 4 ऐवजी 5 सामने खेळवण्याची पहिलीच वेळ ठरली. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर कौटुंबिक कारणामुळे पहिल्या सामन्यात अनुपस्थितीत असलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला. रोहितच्या नेतृत्वात भारताला 2 सामने गमवावे लागले तर 1 सामना बरोबरीत राहिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img