मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राजकारणात जोरदार उमटताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या निषेधार्थ ४ जानेवारीला परभणीत मुक मोर्चा काढण्यात आला. भाजपचे आमदार सुरेश धस, मनोज ज्रांगे पाटील यांच्यासह अनेक नेते या मोर्चात सहभागी होते.त्यावेळी भाषणा दरम्यान आमदार सुरेश धास यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ला केला.
अजित दादा, क्या हुआ तेरा वादा.. अस म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभा गाजवली. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि युवक काँग्रेस महारष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आमदार सुरेश धस यांना घरचा आहेर दिला आहे. आज सकाळीच सुरज चव्हाण यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत, स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ.सुरेश अण्णा धस जाणीव पूर्वक राजकारण करत आहेत.परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा …म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णा ला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का ? असा सवाल विचारला होता.
दरम्यान आज सुरज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता, ‘काल परभणीत झालेल्या सभेत आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावर विनाकारण टीका केली त्यावर मी ट्वीट केलं आहे.सुरेश धस यांनी अजित पवारांना प्रश्न विचारला की क्या हुआ तेरा वादा? मला अजित पवारांवर विश्वास आहे की, जर कोणी दोषी असेल तर त्यावर ते कारवाई करतील. सुरेश धस जाणीवपूर्वक महायुतीत मिठाचा खडा टाकत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की सुरेश धस यांना आवर घाला’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.