-0.4 C
New York

Pune Leopard : ओतूरच्या डुंबरे मळ्यात बिबट्याची मादी जेरबंद

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.५ जानेवारी ( रमेश तांबे )

ओतूर ( ता.जुन्नर ) येथील डुंबरेमळा शिवारात रविवारी  पहाटेच्या सूमारास बिबट्याची मादी जेरबंद करण्यात ओतूर वनविभागाला यश आले आहे.

सदर बिबट्याच्या मादीचे वय अंदाजे सहा वर्षाचे असल्याचे ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी सांगितले.येथील डुंबरेमळा शिवारात बिबट्याचा वावर असल्याने,या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे व येथील स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे केली होती.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच वनविभागाने पिंजरा लावला होता.

दरम्यान रविवारी दि.५ रोजी पहाटेच्या सुमारास,या ठिकाणी बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूर वनविभागाला मिळाली.सदर माहिती मिळताच ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले, वनकर्मचारी किसन केदार,गणपत केदार,गंगाराम जाधव हे डुंबरेमळा या ठिकाणी पोहोचून, येथील स्थानिक नागरिक प्रकाश डुंबरे,सागर डुंबरे,विकास डुंबरे, संभाजी डुंबरे, संजय डुंबरे यांच्या मदतीने बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकडोह बिबटनिवारा केंद्रात हलविण्यात आले.

शेतकऱ्यांनी शेतात दैनंदिन कामे करताना,आपल्या हातात काठी किंवा बॅटरी ठेवावी. तसेच नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन कामे करावीत आणि रात्री अपरात्री बिबट प्रवण क्षेत्रातून आपल्या वाहनाद्वारे वाड्या,वस्त्यांवर जात-येत असताना, वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवावे, जेणेकरून रस्त्याच्या आजूबाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी बाजूला सरकतील असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.]

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img