रविवारी सकाळी ६ वा.५६ मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं कोयना धरण परिसर ( Koyna Dam earthquake ) हादरला. २.४ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली आहे. राज्यात नव्या वर्षात झालेला हा पहिला भूकंप आहे. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनानं दिला आहे.
Koyna Dam earthquake नव्या वर्षातील पहिला भूकंप
पाटण तालुका हा भूकंप प्रवण मानला जातो. या तालुक्यातील कोयना धरण परिसरात सातत्यानं भूकंपाचे लहान-मोठे धक्के जाणवतात. कोयना धरण परिसरात
नवीन वर्षातही पहिला भूकंप झाला. रविवारी सकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी २.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य धक्क्यानं कोयना धरण परिसर हादरला.
Koyna Dam earthquake भूकंपाचा केंद्रबिंदू ९ किमी अंतरावर
भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरण परिसरात झालेल्या धरणापासून ९ किलो मीटर अंतरावर गोषटवाडी गावच्या हद्दीत होता. केवळ कोयनानगर परिसरातच भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो जाणवला. कोयना धरणाला भूकंपामुळे कोणताही धोका पोहोचला नसून पूर्णपणे सुरक्षित धरण असल्याचं धरण व्यवस्थापनानं सांगितलं.
Koyna Dam earthquake धरणाची सुरक्षा होणार अधिक बळकट
भूकंपाचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी कोयना धरणावर विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. धरणाची सुरक्षा या माध्यमातून अधिक बळकट होणार आहे.
भूकंप कसे होतात?पृथ्वी ही अनेक वेगवेगळ्या थरांनी बनलेली आहे. त्याच्या सर्वात वरच्या थराला क्रेस्ट म्हणतात. हा थर लहान मोठ्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो. जेव्हा हे तुकडे एकमेकांना धडकतात, तेव्हा दबावामधून घर्षण होते. त्यातून मोठमोठे खडक तुटतात. हे खडक तुटल्यानं उर्जा तयार होते. भूकंपाच्या लाटांद्वारे ती उर्जा एका क्षेत्रातून दुसऱ्या भागात गेल्यानंतर भूकंपाचे धक्के जाणवतात. भूकंप मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला सिस्मोग्राफ म्हटले जाते. ही उपकरणे अनेक भागात खाजगी किंवा सरकारी संस्थांद्वारे बसवण्यात आली आहेत.