19.9 C
New York

China Virus : चीन पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठयावर ?

Published:

HMPV (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) विषाणू (China Virus) अत्यंत वेगाने चीनमध्ये पसरत आहे. अनेक राज्यांमध्ये वाढत्या प्रादुर्भावामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनापेक्षा अधिक धोकादायक हा विषाणू असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. चीनमधील अनेक भागांत परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, नागरिक मास्क वापरण्यास सुरुवात करत आहेत. हजारो लोक या विषाणूला बळी पडत असून, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्गाची तीव्रता अधिक दिसून येत आहे.रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, बालवॉर्डमध्ये विशेषतः प्रचंड प्रमाणात रुग्ण भरले आहेत. रुग्णालयांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

China Virus HMPV विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात

चीनच्या उत्तर भागात HMPV विषाणूचा मोठा प्रसार झाला आहे. विमानतळांवरही गर्दी वाढली असून, अनेक राज्यांमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. व्हायरोलॉजी तज्ज्ञ डॉ. लिन जियाजू यांच्या मते, एचएमपीव्ही विषाणू पूर्वी सौम्य स्वरूपाचा होता, मात्र आता तो गंभीर प्रकरणांना कारणीभूत ठरत आहे. लोकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये झालेली घट आणि विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. हा विषाणू चीनमधून इतर देशांमध्येही पसरत आहे. इंग्लंडमध्ये फ्लूचा झपाट्याने प्रसार होत असून, रुग्णालयांतील रुग्णसंख्या चौपट झाली आहे.

China Virus HMPV विषाणूची वैशिष्ट्ये

नाव: ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस (HMPV)
प्रकार: आरएनए विषाणू (फ्लूसारखा पसरतो)
लक्षणे: खोकला, ताप, नाक बंद होणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास
प्रभाव: वृद्ध, लहान मुले, आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक
प्रसार: खोकला, शिंकणे, संपर्काद्वारे
HMPV संसर्ग टाळण्यासाठी उपाय
साबणाने वारंवार हात धुणे
सॅनिटायझरचा वापर
मास्कचा नियमित वापर
लक्षणे दिसल्यास वेगळे राहणे
गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे
तज्ज्ञांच्या मते HMPV विषाणूचे धोकादायक परिणाम
लहान मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरतो.
दमा आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो.
2 वर्षांखालील मुलांना या विषाणूचा अधिक त्रास होतो.
72 तासांत 94 हवाई हल्ले, 184 जणांचा मृत्यू; इस्त्रायलचा गाझामध्ये कहर
जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) भूमिका
WHO ने विषाणूच्या उत्परिवर्तनावर लक्ष ठेवले असून, मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

China Virus HMPV विषाणूचा इतिहास

HMPV विषाणू प्रथम 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये ओळखला गेला. हा पॅरामिक्सोव्हिरिडे कुटुंबातील विषाणू असून, हिवाळ्यात त्याचा प्रसार अधिक होतो. खोकल्याने किंवा शिंकण्याने तो इतर लोकांपर्यंत पोहोचतो.

China Virus प्रभावित देश

HMPV विषाणू आतापर्यंत चीनसह नेदरलँड, ब्रिटन, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आणि अमेरिका या देशांमध्ये आढळला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img