-2 C
New York

Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे शहाणा हो, नाहीतर आम्ही..’, मनोज जरांगेंचा रोखठोक इशारा

Published:

राज्यात बीड जिल्ह्यतील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात फरार असलेल्या अटक झाली आहे. आणखी एक फरार आहे त्याच्या अटकेसाठी त्याच्या अटकेसाठी शोध मोहिम सुरू आहे. तर दुसरीकडे जनआक्रोश मोर्चा आज पुण्यात काढण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील या मोर्चात सहभागी झाले आहेत. याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मंत्री धनंजय मुंडे यांना रोखठोक इशारा दिला आहे. धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री साहेब ह्यांना आवरा नाहीतर आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दिला आहे.

जरांगे पुढे म्हणाले, आता आम्ही न्यायासाठी आंदोलन करत आहोत. त्यामुळे राज्यभरात समाज रस्त्यावर उतरला आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शांत राहा शांत राहा असं सांगत जाणूनबुजून त्यांनी हे सगळं केलं आहे. धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री साहेब यांना आवरा नाहीतर आम्ही थांबणार नाही. धनंजय मुंडे आमचेच लोक तुला अडकवतील. ज्या मराठ्यांनी तुला वाचवलं त्यांच्यावरच तू पलटला. आता प्रति मोर्चे काढले तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देऊ असा इशारा जरांगे यांनी दिला.

Manoj Jarange सगळ्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे अजून तरी बोललेलो नाही. तुमच्या सरकार मध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायची आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठे शांत आहेत. आम्हाला हे लोक खूप त्रास देत आहेत. यातून एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img