-2 C
New York

Chikungunya :  काळजी घ्या ! राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले

Published:

राज्यात चिकनगुनियाने हातपाय पसरले आहे. (Chikungunya) राज्यात रुग्ण संख्या वाढली आहे. ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक सापडले आहेत. ऐन थंडीत नागरिकांच्या हातपायांना ठणक लागली आहे. राज्यातील अनेक शहरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहे. या रोगाने मुंबईसह अनेक शहरात डोके वर काढले आहे. तर नागपूर येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.

Chikungunya राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

थंडीचा कडाका पु्न्हा वाढला आहे. तर हवेची गुणवत्ता मुंबई सारख्या शहरातील खालावली आहे. न्यूमोनिया, चिकनगुनिया आणि विषाणूजन्य आजारात पालिका क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चिकनगुनियच्या रुग्ण संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्य आरोग्य खात्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

Chikungunya चिकनगुनिया विषाणूजन्य आजार

चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या संक्रमित मादीपासून फैलावतो. डेंग्यूसारखी लक्षणे असली तरी या आजारासाठी भिन्न उपचारांची आवश्यकता असते. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत रूग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Chikungunya चिकनगुनियाचा चढता आलेख

मुंबईत गेल्या वर्षात, १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान मुंबईत ७३५ रुग्णांची नोंद झाली आहे. २०२२ मध्ये चिकनगुनियाचे १८ रुग्ण आढळले होते. तर २०२३ मध्ये २५० रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या ४८५ नीं वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. राज्य आरोग्य विभागाने पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img