-2 C
New York

Adani Electricity : अदानीसाठी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला केराची टोपली

Published:

मुंबई / रमेश औताडे

सर्वसामान्य राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन काळात सभागृहात केली होती. मात्र महाराष्ट्रात व ठाणे जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची कारवाई सुरू झालेली आहे. अदाणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला केराची टोपली दाखवली जात असून महावितरण चे ग्राहक अजून भरडले जाणार असल्याचा आरोप ६ राजकीय पक्ष व ४५ कामगार संघटनांनी एका जाहीर बैठकीतून केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री असताना ३ जुलै २०२४ रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वसामान्य राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही ही घोषणा सभागृहात केली होती. मात्र आता फॉल्टीमीटर व नवीन वीज पुरवठ्या करीता स्मार्ट प्रीपेड मीटर अदानी कंपनीने बसविण्यात सुरुवात केलेली आहे. ही सामान्य जनतेची फसवणूक सरकार अदानीच्या माध्यमाने करत आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट),शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),भारतीय कम्युनिस्ट पार्टी,शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी,मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व धर्मराज पक्ष (राजन राजे),ठाणे जिल्ह्यातील कार्यरत सर्व क्षेत्रातील कामगार संघटना,वीज कंपन्यातील कामगार संघटना यांची संयुक्त बैठक ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड एम.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला ६ राजकीय पक्ष व ४५ कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्मार्ट प्रीपेड मुळे वीज ग्राहक, वीज कर्मचारी,सामान्य जनता व वीज कंपन्या काम करणारे कंत्राटी व परमनंट कर्मचारी यांच्यावर काय परिणाम होणार आहे. याबाबत विस्तृत मार्गदर्शन कॉम्रेड गिरीश भावे,कॉम्रेड कृष्णा भोयर,कॉम्रेड विश्वास उटगी,एम.ए.पाटील,आत्माराम विशे,कॉम्रेड लिलेश्वर बनसोड इत्यादी वक्त्यांनी मार्गदर्शन करत ७ जानेवारी ला स्मार्ट प्रीपेड मीटरचा तीव्र विरोध करणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img