नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक चित्रपट रिलीज झाले. ३ जानेवारी २०२५ ला १२ वर्षांनी ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘ये जवाने है दिवानी’ हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज होणार अशी बातमी समजताच तरुणाईंनी सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली. हा सिनेमा पाहण्यासाठी तरुणाईंनी गर्दी केली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ‘बत्तमीज दिल’या गाण्यावर प्रेक्षक थिरकताना दिसत आहेत.
World Demand Coffee : हा देश जगात सर्वाधिक कॉफी निर्यात करतो, जाणून घ्या
३१ मे २०१३ रोजी ‘ये जवानी है दिवानी’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. रनबीर कपूर, दीपिका पडुकोण , कल्की कोएचलीन, आदित्य रॉय कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील गाण्याने आणि कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. १२ वर्षांनी हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज झाल्याने प्रेक्षकांनी या सिनेमाला पुन्हा एकदा पसंती दिली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सिनेमा १ कोटी २५ लाखांची कमाई केलीय. या सिनेमातील ‘बत्तमीज दिल’ या गाण्यावर प्रेक्षक संपूर्ण थिएटर मध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहेत. सिनेमातील गाणी, डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत.पुन्हा एकदा बनी, नैना आणि त्याच्या मित्रांना पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.