बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करत आहे, जो या मालिकेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. मात्र खेळाच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने अचानक मैदान सोडले. बुमराहने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अप्रतिम गोलंदाजी करत 1 यशही मिळवले.
Jasprit Bumrah बुमराहने सिडनीचे मैदान सोडले
जसप्रीत बुमराह दुपारच्या जेवणानंतर मैदानावर दिसला नाही. त्याला सपोर्ट स्टाफसोबत मैदान सोडताना दिसले. यावेळी तो टीम इंडियाच्या मॅच जर्सीतही नव्हता. त्याने ट्रेनिंग किट घातली होती. ज्यानंतर जसप्रीत बुमराह काहीशा अडचणीत असल्याचे मानले जात आहे. याशिवाय तो मैदानाबाहेर एका कारमध्येही दिसला. वास्तविक, जसप्रीत बुमराहला काही दुखापत झाली असून त्याला टीम स्टाफसह स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले आहे. त्याने कोहलीशी बोलून मैदान सोडले आणि त्यानंतर अधिकृत प्रसारकांनी त्याला संघ सुरक्षा संपर्क अधिकारी अंशुमन उपाध्याय आणि टीम डॉक्टरांसह मैदान सोडताना दिसला.जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत 32 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत बुमराहने मैदान सोडणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. सिडनी कसोटीच्या या डावात बुमराहने आतापर्यंत 10 षटके टाकली आहेत आणि 2 बळीही घेतले आहेत. म्हणजेच या सामन्यातही तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहली आता कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे.
Jasprit Bumrah या दुखापतीने बुमराहला वारंवार त्रास दिला आहे
जसप्रीत बुमराहला अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीने ग्रासले आहे. मागच्या वर्षीच बुमराहने न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चमध्ये पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. जून 2022 मध्ये त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर दुखापतीमुळे तो २०२२ च्या टी२० विश्वचषकात सहभागी होऊ शकला नाही. या दुखापतीमुळे त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागले. अशा स्थितीत बुमराहची दुखापत फारशी गंभीर नाही, अशी आशा भारतीय चाहत्यांना असेल.