बहुमताने महायुती सरकार सत्तेत आल. मात्र, खाते वाटपाचं गुर्हाळ चांगलंच लांबल. तीनही पक्षात दावे-प्रतिदावे त्यानंतर आता पालकमंत्री कोण यावरून करण्यात येत आहे. (Guardian Ministers) महायुतीसमोर दोघा-तिघांनी एकाच जिल्ह्यात दावे ठोकल्याने पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन दोन पक्षांनी यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दावा केल्याने सुद्धा अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोण असतील याची यादी मात्र, संभाव्य जिल्ह्यांचे पालकमंत्री समोर आली आहे. पालकमंत्र्यांच्या संभाव्य यादीत कोण-कोण असणार हे समोर आलं आहे.
धनंजय मुंडे यांचे नाव मात्र, संभाव्य यादीमध्ये बीड जिल्ह्यासाठी नसलं तरी त्यांच्या ताब्यात नजीकच्या धाराशिव जिल्हा हा दिला जाईल अशी संभाव्य यादी मधून माहितीसमोर येत आहे. पुणे जिल्ह्याचे आणि बीड जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याकडेच ठेवतील अशी चिन्हे आहेत. तिन्ही पक्षांचं एकमत तर जवळपास 80 टक्के जागांवर झाल्याचे समोर येत आहे. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेंच सुरू असल्याचे दिसते.
Guardian Ministers पालकमंत्र्यांची संभाव्य यादी
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
अकोला – आकाश फुंडकर
धुळे – जयकुमार रावल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार
नंदुरबार – अशोक वुईके
पालघर – गणेश नाईक
सिंधुदुर्ग- नितेश राणे
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
ठाणे – एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ /
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा
यवतमाळ – संजय राठोड
हिंगोली – आशिष जैस्वाल
मुंबई शहर – प्रताप सरनाईक
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन
रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे
रत्नागिरी – उदय सामंत
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर
भंडारा – मकरंद पाटील
चंद्रपूर – नरहरी झिरवळ