डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील ‘सेंट्रल पे अँड पार्क’ मध्ये ठेकेदार अनधिकृत दरपत्रक लावत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनात आले. अधिकृत दरपत्रक लावले नसल्याने वाहनचालकांकडून मनमानी दर आकारून लूट करीत असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी शनिवार 4 तारखेला पे अँड पार्क येथे जाऊन ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी मनसैनिक व ठेकेदरांचे कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. कर्मचाऱ्याने दरवाजा बंद केल्याने मनसैनिकांनी डोंबिवली रेल्वे प्रबंधक हरी प्रसाद मणी यांची भेट घेऊन सदर प्रकार सांगितला. मनसैनिक, रेल्वे प्रबंधक व रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्याला विचारले असता त्याने जास्तीचे दर आकारल्याचे मान्य करत उपस्थित वाहनचालकांना पैसे परत केले. पे अँड पार्क ठिकाणी अधिकृत फलक लावले. मनसेमुळे आम्हाला समजले की आमची लूट होत असून त्याबद्दल आम्ही मनसेचे आभार मानतो.
Manoj Jarange : धनंजय मुंडेंला रस्त्याने फिरू देणार नाही; परभणीत मनोज जरांगेंची गर्जना
डोंबिवली पश्चिमेला द्वारका हॉटेलजवळ सेंट्रल पे अँड पार्क असून याठिकाणी अधिकृत दरपत्रक लावले नव्हते. वाहनचालकांकडून मनमानी दर लावून पैसे घेतले जात होते. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे नागरिकांनी तक्रार केले असता शनिवारी उपशहर अध्यक्ष राजू पाटील, प्रेम पाटील,संजय बाविस्कर, सुमेधा थत्ते,श्रद्धा किर्पे, श्रद्धा शिगवन, रितेश म्हात्रे,अश्विन पाटील, विद्याधर पॉगम व सामाजिक कार्यकर्ता गणेश कदम यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता अधिकृत दरपत्रक नसल्याचे दिसून आले. मनसैनिकांनी याचा जाब विचारला असता सुरुवातीला तेथील कर्मचाऱ्याने बाचाबाची करण्यास सुरुवात केली. येथील दरवाजा बंद करून निघून गेल्यावर मनसैनिकांनी डोंबिवली रेल्वे प्रबंधक मणी यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी मणी यांनीही सेंट्रल पे अँड पार्क मध्ये अधिकृत दरपत्रक नसल्याचे निदर्शनात आल्याचे मनसैनिकांना सांगितले.त्यानंतर मनसैनिक, रेल्वे प्रबंधक आणि रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी यांनी पे अँड पार्क मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्याला अधिकृत दरपत्रक लावले नसल्याबद्दल विचारले. येथील कर्मचाऱ्याने आधी त्यांनी सांगितले कारण न पटण्यासारखे असल्याने मनसैनिकांनी सांगत नागरिकांनी अधिकृत दरपत्रक समजावे याकरता मनसेने दरपत्रक लावले.रेल्वे सुरक्षा बलाने सांगितल्यानंतर पे अँड पार्क मध्ये अधिकृत दरपत्रक लावण्यात आले. तर काही वाहनचालकांनी आपल्याकडून जास्तीचे दर आकारून पैसे घेण्यात आल्याचे मनसैनिक व रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांना सांगितले. पे अँड पार्क मधील कर्मचाऱ्याने त्या वाहनचालकांना आकारले जास्तीचे पैसे परत केले. त्याबद्दल वाहनचालकांने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले.