-1.8 C
New York

Manoj Jarange : ‘सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा’, फरार आरोपी गजाआड होताच जरांगेंची मागणी

Published:

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणी फरार असलेल्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. तिसरा आरोपी अजूनही फरार आहे. सीआयडी पथक आणि एसआयटी द्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासात दोघांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या तीन आरोपींपैकी सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे (दोघे रा. टाकळी, ता. केज) या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली. यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. आता एक काम सरकारने केलं पाहिजे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. आता सरकारने आजिबात हयगय करता कामा नये. कारण यामागे एक मोठं रॅकेट आहे. पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जात आहे. याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्‍यांचं प्रचंड राजकीय पाठबळ आहे. या लोकांना कोण सांभाळत आहे त्यांना देखील अटक झाली पाहिजे.

धनंजय मुंडेंला रस्त्याने फिरू देणार नाही; परभणीत मनोज जरांगेंची गर्जना

Manoj Jarange फरार दोघांना पुण्यातून अटक

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. बीड पोलीस, एसआयटी आणि सीआयडीने हत्येचं प्रकरण गंभीर असल्याने आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली होती. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेत वेगाने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. टेक्निकल टीम या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गठीत केल्या होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img