-2.4 C
New York

Rohit Sharma : रोहितने माघार घेतली की त्याला बाहेर काढलं? उत्तर देत स्वतःच केला खुलासा

Published:

दरम्यान पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया सिडनीत सुरू आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्याही टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) नाही. खराब कामगिरीमुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं आहे. क्रिकेट करिअर रोहितचं यानंतर संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. रोहित शर्मानेच यावर आता खुद्द उत्तर देत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. मी स्वतःच सिडनी कसोटीतून बाहेर बसलो आहे. सध्या माझी बॅट चालत नाही असे रोहित शर्मा म्हणाला.

रोहित म्हणाला, मी स्वतःच सिडनी कसोटीतून बाहेर बसलो आहे. सध्या माझ्या बॅटमधून धावा होत नाहीत. त्यामुळे मी निवडकर्ते आणि प्रशिक्षकाला सांगितलं आहे. पाचव्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी सुद्धा दोन मुलांचा बाप आहे. कधी काय करायंच हे मला माहिती आहे. हा सामना भारतासाठी महत्वाचा आहे. जे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत त्यांना संधी मिळायला हवी म्हणून मी बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहितच्या करिअरला ब्रेक लावणारे 188 दिवस; सहा महिन्यांत नेमकं काय घडलं?

आता जरी माझ्याकडून धावा होत नसल्या तरी पाच महिन्यांनंतरही होणार नाहीत याची शाश्वती नाही. पण माझा हा निर्णय निवृत्तीचा नक्कीच नाही. लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवणार नाहीत की मी कधी निवृत्त व्हायचं, असे रोहित शर्माने ठणकावून सांगितलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img