-1.8 C
New York

Manoj Jarange : धनंजय मुंडेंला रस्त्याने फिरू देणार नाही; परभणीत मनोज जरांगेंची गर्जना

Published:

सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात दमदाटी करण्यात आल्याचा आरोप केला होता. यावरून मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांना वॉर्निंग दिली आहे. देशमुख कुटुंबाला त्रास झाला, तर एकालाही रस्त्यावर फिरून देणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्यासाठी परभणीत आयोजित केलेल्या मूकमोर्चात ते बोलत होते..यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, यापुढे जर देशमुख यांच्या कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, धनंजय मुंडेंला रस्त्याने फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला तो सहन केला, पण यापुढे देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर एकाला देखील रस्त्याने फिरू देणार नाही.

“आमची लोक मारून तुम्ही आरोपींना घरात लपवून ठेवता. पुण्यात आरोपींना सांभाळलं कुणी? सगळे आरोपी पुण्यातच सापडत आहेत. याचा अर्थ सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळत आहेत. खंडणी आणि हत्येतील आरोपींची नार्कोटेस्ट झाली पाहिजे. त्यांना सांभाळणाऱ्यांना सहआरोपी केले पाहिजे,” अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.

पुढील काळात जर समाजावर हल्ले झाले, तर उत्तर तसंच द्यायचं. समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. महायुती असो किंवा महाविकास आघाडी जो आपल्या बाजूने बोलेल, मराठ्यांनी त्याच्याच पाठीमागे उभं राहायचं. देशमुख कुटूंब एकटं नाही, राज्यातील सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे. मनोज जरांगे अन् व्यासपीठावर बसलेले सर्व मराठे संतोष देशमुख यांना कायद्याने न्याय दिला नाही, तर हा न्याय देवू, असा शब्द मनोज जरांगे यांनी दिलाय.धनंजय देशमुख न्यायासाठी फिरतात तर तुम्ही त्यांना धमक्या देतात. खंडणी, हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट व्हावी, संतोष देशमुखांना न्याय दिल्याशिवाय मागे हटायचं नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img