डोंबिवली ( शंकर जाधव )
‘अमृत योजने’अंतर्गत कल्याण-डोंबिवली शहरासाठी ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार असून १०५ दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे.27 गावातील वाढीव पाणी पुरवठ्याबाबत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कल्याण ग्रामीण मतदार संघांचे आमदार राजेश मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याला यश आल्याने नागरिकांनी आभार मानले आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 27 गावातील पाणी प्रश्नावर लक्ष देत सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाणी प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली होती. तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे यांनी हिवाळी अधिवेशनात 27 गावात पाणी पुरवठा वाढवावा असे सांगितले होते. त्याचप्रमाणे आमदार मोरे यांनी 27 गावातील पाणी समस्येवर गावाकऱ्यांशी चर्चा केली.यावेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट मॅनेजर चेतन मोरे हेही उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने अखेर याला यश आले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमृत योजने’ अंतर्गत कल्याण-डोंबिवली शहरासाठी ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.