-2.3 C
New York

Maharashtra government : ‘पुढील तीन महिन्यात सरकार पडणार म्हणजे पडणार’, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Published:

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महायुती सरकारची (Maharashtra government) कामकाजाला सुरुवात झाली आहे. काही मंत्र्यांनी अद्यापही मंत्रि‍पदाचा कार्यभार घेतलेला नाही. काही जणांची नाराजी अजूनही कायम आहे. त्यातच आता पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेंच सुरू झाली आहे. या घडामोडींवर विरोधकांकडून सरकारमधील टीका केली जात आहे. यातच आता शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी महायुती सरकारबाबत खळबळजनक दावा केला आहे. राज्यातील सरकार शंभर टक्के पुढील तीन महिन्यांत पडणार म्हणजे पडणार असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या राजकीय वर्तुळात या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महायुती सरकारची कामकाजाला सुरुवात झाली आहे. काही मंत्र्यांनी अद्यापही मंत्रि‍पदाचा कार्यभार घेतलेला नाही. काही जणांची नाराजी अजूनही कायम आहे. त्यातच आता पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेंच सुरू झाली आहे. या घडामोडींवर विरोधकांकडून सरकारमधील टीका केली जात आहे. यातच आता शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी महायुती सरकारबाबत खळबळजनक दावा केला आहे. राज्यातील सरकार शंभर टक्के पुढील तीन महिन्यांत पडणार म्हणजे पडणार असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या राजकीय वर्तुळात या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तुम्ही जर ईव्हीएम हॅक करून दाखवलं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय की त्यांची संपूर्ण संपत्ती भेट म्हणून देण्यास तयार आहेत असे विचारले असता जानकर म्हणाले, मागील एक महिन्यापासून मी ईव्हीएम संदर्भात आंदोलन करत आहे. माझ्या तालुक्यात ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याच राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मी बारामती मतदारसंघाचाही अभ्यास केलाय. अजित पवार 20 हजार मतांनी या ठिकाणी पराभूत आहे. 13 हजार मतांच्या फरकाने
जयकुमार गोरे सद्धा पराभूत आहेत.

आता निंबाळकर यांनी मला प्रॉपर्टी भेट देणं न देणं यासाठी माझा लढा नाही. सर्व निवडणुका परत घ्या असं माझं निवडणूक आयोगाला आवाहन आहे. तरी या निवडणुका पुन्हा घेतल्या जाणार नाहीत हेही मला ठाऊक आहे. मी राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्याबरोबर अजित पवारांचाही राजीनामा घ्या. अजित पवार दहा हजार मतांनी तरी निवडून येतात का हेच मला पाहायचं आहे असे जानकर म्हणाले. राज्यातील बारामती आणि माळशिरस या दोनच मतदारसंघातील पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी माझी मागणी आहे. या निवडणुका बॅलेट पेपरवर घेत नाहीत तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मी सरकारला चार महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. त्यातील चार दिवस आता कमी झालेले आहेत. आता फक्त 3 महिने आता 26 दिवस बाकी राहिलेत. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की राज्यातील महायुतीचं सरकार एक हजार टक्के जाणार म्हणजे जाणार. ज्यावेळी मी सर्वांसमोर पुरावे सादर करेन त्यावेळी अख्खा देशच गडबडून जाईल. पण त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडे कोणताच पर्याय राहणार नाही. म्हणूनच मी सांगतोय की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असे आमदार उत्तम जानकर म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img