महायुतीच्या खातेवाटपात जलसंपदा खाते विभागून दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. परंतु, या चर्चांत काही तथ्य नाही याचा खुलासा पुन्हा एकदा मंत्री विखे पाटील यांनी स्वतःच केला आहे. त्यामुळे विखे पाटील मंत्रिमंडळात नाराज असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री विखे पाटील काल पंढरपुरात होते. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटीच्या अहवालानंतरच होईल असे विखे पाटील म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळाच्या खात्यांच्या वाटपावर कोणीही नाराज नाही, जलसंपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही, या खात्यात काम करण्यास भरपूर वाव आहे, नदीजोड प्रकल्प, तसेच तुटीचे गोदावरी खोरे यात कामाला चांगला वाव आहे, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
Radhakrishna Vikhe एसआयटीच्या अहवालानंतरच राजीनाम्याचा निर्णय
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. सीआयडी आणि पोलीस अशा दोघांकडूनही तपास केला जात आहे. मात्र या सर्वात वाल्मीक कराडच्याच नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. वाल्मीक कराड शरण आला असला तरी त्याच्यावर खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. तरी देखील या प्रकरणात वाल्मीक कराडवर आरोप होत आहे. त्यातच वाल्मीक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढू लागला आहे. परंतु, या प्रकरणाशी माझा संबंध नाही. मी राजीनामा का देऊ असे कालच मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले होते.
कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यातील; जितेंद्र आव्हांडांचे धक्कादायक दावे
या घडामोडी घडत असतानाच विखेंनीही मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बीड हत्या प्रकरणात सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे. एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्या, अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा सुरू आहे. दोन्ही पवार एकत्र यावे यासाठी अजित पवार यांच्या मातोश्रींनी विठुराया चरणी साकडे घातले. याविषयी विचारलं असता विखे म्हणाले की, दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा, असं विखे म्हणाले.