-2.2 C
New York

Navi Mumbai firing : नवी मुंबईत भर दिवसा गोळीबार, 6 राउंड फायर

Published:

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नवी मुंबईतील क्राइमच्या घटना समोर (Navi Mumbai firing) आल्या आहेत. आई-मुलाची हत्या समलिंगी संबंधातून केल्याची घटना ताजी असताना आता सानपाडा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. डी मार्ट परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. हा व्यक्ती गोळीबार करुन फरार झाला.मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वीच ही घटना घडली. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या जवळ डी मार्ट आहे. त्या डी मार्ट च्या बाजूलाच हे फायरिंग करण्यात आलेलं आहे. अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे, या रस्त्यावरती फायरिंग झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या सानपाडाजवळ डी मार्ट आहे. डी मार्टच्या जवळच आरोपींनी राजाराम ठोके यांच्यावरती गोळीबार केल्याची माहिती आहे. सानपाड्यातील स्टेशन जवळचा रस्ता मोठ्या वर्दळीचा आहे. या रस्त्याचा वापर अनेक नागरिक करत असतात. हा गोळीबार भर दिवसा घडल्यानंतर नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करणारे दोन आरोपी होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. आरोपी पाच ते सहा राऊंड फायर करून फरार झाले आहेत, राजाराम ठोके या घटनेत जखमी झाल्याची माहिती समोर आली, पोलीस घटनास्थळी सानपाडा दाखल झाले आहेत. त्या घटनेचा तपास करत आहेत.

‘मी नाराज नाही, जलसंपदा खात्यात कामच काम..’, नाराजीच्या चर्चांना विखेंचा फुलस्टॉप!

पाच ते सहा राउंड फायर करुन आरोप फरार झाला आहे. या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध सुरू आहे. तर जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात आहेत. हा व्यक्ती कोण होता, त्याने गोळीबार का केला, त्याच्याकडे पिस्तुल कुठून आलं या सगळ्याचा तपास सुरू झाला आहे. दोन आरोपींकडून फायरिंग, फायरिंग करून बाईक वरून आरोपी फरार झाला आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img