एका मोठ्या चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत भारतीय क्रिकेट (India Cricketers) संघाचे दिग्गज खेळाडू अडकले आहेत. गुजरात पोलिसांच्या CID क्राईम ब्रँचने 450 कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन यांना समन्स बजावले आहे. गुजरातस्थित कंपनीने गुंतवणूकदारांना बँकांपेक्षा जास्त व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. पण, अनेक गुंतवणूकदारांनी त्यांचे व्याज न मिळाल्याने कंपनीविरुद्ध तक्रार केली होती.
पॉन्झी योजनेचा सूत्रधार भूपेंद्र सिंग जाला याच्याकडे चौकशी केल्यानंतर खेळाडूंना समन्स बजावण्यात आले आहे. या खेळाडूंनी गुंतवलेले पैसे परत केले नसल्याची माहिती जाला यांनी सांगितले. अहवालात असे सुचवले आहे की, गिलने ₹1.95 कोटींची गुंतवणूक केली आहे, तर इतर खेळाडूंनी कमी रक्कम गुंतवली आहे.
या घोटाळ्यात मेहता यांचा सहभाग आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीआयडीने बँक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी टीम तैनात केली आहे आणि जाला यांचे एक अनधिकृत खातेही आहे. जे खातेपुस्तक जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात सोमवारपासून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे.
India Cricketers घोटाळ्याची रक्कम 450 कोटींहून अधिक
भूपेन्द्र सिंह जाला यांनी राजस्थानसह देशभरात आकर्षक गुंतवणूक योजनांचे जाळे पसरवले. कमी वेळीत जास्त व्याज देण्याचे आश्वासन देऊन पॉन्झी योजना सुरू केली. सुमारे 14 हजार लोकांनी या गुंतवणूक केली. ज्यामध्ये सीआयडीच्या प्राथमिक तपासात जाला यांनी 6000 कोटी रुपयांची मोठी फसवणूक केल्याची माहिती समोर आली. तपास जसजसा पुढे गेला तसतशी ही रक्कम 450 कोटींवर आणल्याचे आढळून आले. याप्रकरणी छापेमारी सुरूच आहे. या घोटाळ्याची रक्कम 450 कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाला यांची अनेक खाती आहे. त्या खात्यात सुमारे 52 कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. सध्याच्या तपासाच्या आधारे घोटाळ्याची एकूण रक्कम 450 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. छापेमारी सुरू राहिल्यास हे प्रमाण वाढू शकते.