2025 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. अनेकांनी या नव्या वर्षांचं स्वागत मस्तपैकी पार्टी करत एंजॉय करत केले. पण काही महाभाग असेही होते की ज्यांनी नव्या वर्षाचे स्वागत सोशल मिडीयावर इतरांच्या पोस्टवर कमेंट करत केले. स्विगीच्या इंस्टामार्ट च्या एक्स पोस्टवर कमेंट करत एकाने सरळ-सरळ गर्लफ्रेंडच ऑर्डर केली. त्याला स्विगीकडून चोख उत्तरही मिळालय.
आपल्या सर्वांना माहित असलेले स्विगी आणि इंस्टामार्ट या ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून आपण खाण्याचे पदार्थ व वापरण्यात येणाऱ्या वस्तु मागवत असतो. या वस्तुंमध्ये ग्रोसरीपासूून ते अनेक वस्तुंचा समावेश आहे. अशातच नव्या वर्षाच्या एक दिवस आधी म्हणजेच 31 डिसेंबरच्या दुपारी स्विगीच्या इंस्टामार्टने आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट केली होती.
Kalyan Case : अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणात नराधम पती-पत्नीच्या पोलिस कोठडीत २ दिवसांची वाढ
त्या पोस्टमध्ये लोकांनी त्यांच्याकडून 4779 काँडम्स विकत घेतल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यात असेही म्हंटले होते की, ‘दुपारपर्यंतच इतक्या मोठ्याप्रमाणात काँडमची विक्री झालेली आहे. हे तुमच्यासाठी चांगले आहे. नाही तर नवीन वर्षात नवीन कोणीतरी येण्याची शक्यता होती.’
त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी चागल्याच कमेंट्स केल्या आहेत. त्यात @Meme_Canteen नावाचे हँडल असलेल्या व्यक्तीने लिहिले की, माझ्या पिन कोडवर एक गर्लफ्रेंड डिलिव्हरी करा. दुसऱ्या एकाने लिहिले की नवीन वर्षात गर्लफ्रेंडसोबत पार्टी करण्याची इच्छा आहे.
Jitendra Awhad : …तेव्हा लाज वाटली नाही का? आव्हाडांचा नरहरी झिरवाळ यांना सवाल
या कमेंट्स वाचल्यानंतर इंस्टामार्ट हँडलही त्यांना उत्तर देण्याचे टाळू शकला नाही. त्यांनी उत्तर दिले की अशा प्रकारच्या सेवा इथे नाहीत. इंस्टामार्टने एक रागाने लाल झालेली इमोजीचा वापर करत लिहिले की, ‘आम्हाला एक्स वापरकर्त्यांचा मूड खराब करायचा नव्हता. त्यामुळे किराणा डिलिव्हरी एपवर गर्लफ्रेंड शोधण्याऐवजी लॉलीपॉप ऑर्डर करण्याचा सल्ला दिला गेला आहे. रात्री उशिराची फि काढली आहे. चला, एक लॉलीपॉप ऑर्डर करा.