-0.5 C
New York

Sameer Wankhede : शाहरुख खानसोबतच्या लीक चॅटबाबत काय म्हणाले समीर वानखेडे?

Published:

बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करणाऱ्या किंग खानच्या मुलाला 2021 मध्ये अटक झाली होती आणि फक्त इंडस्ट्रीच नाही, तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा ड्रग्ज प्रकरणात गजाआड असल्याच्या चर्चांना जगभर उधाण आले होते. जामीन मिळेपर्यंत तो तब्बल 25 दिवस तुरुंगात होता. त्यानंतर मात्र, त्याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका झाली होती. त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर म्हणुन काम पाहणाऱ्या समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास चालला. आता या घटनेला तीन वर्षांचा काळ उलटल्यानंतर तत्कालीन NCB झोनल डायरेक्टर समीन वानखेडेंनी काही वक्तव्य अगदी स्पष्टपणे केली आहेत. दरम्यान, या प्रकरणात समीर वानखेडेंवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानसोबत समीर वानखेडे यांचं चॅट लीक झाल्यानंतर आर्यनला सोडण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला होता. आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडे हे सेलिब्रिटींना टार्गेट करतात असे आरोप त्यांच्यावर झाले होते.

समीर वानखेडे यांनी ‘NewJ’ ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले की, “मला टार्गेट करण्यात आले, असे मी म्हणणार नाही, पण मी सर्वात नशीबवान व्यक्ती आहे, असे नक्की म्हणेन. कारण मला मध्यमवर्गीय लोकांचे खूप प्रेम मिळाले. मला मिळालेल्या प्रेमामुळे हे सगळे सहन करणे शक्य झाले, असे कधी कधी वाटते. त्याच्या दृष्टीने कोणी कितीही मोठा असला तरी प्रत्येकाने, समान नियमाने कायद्याला सामोरे जावे. मला कसलाही पश्चाताप नाही, पुन्हा संधी मिळाली तर मी पुन्हा तेच करेन.”

NCB चे तत्कालिन डायरेक्टर समीर वानखेडे यांचे शाहरुख खानसोबतचे कथित चॅटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याबाबत विचारल्यावर मात्र त्यांनी या सर्वावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी बोलताना न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेत सांगितले की, त्यांना या प्रकरणाबद्दल बोलण्यास मनाई आहे. तसेच, यावर बोलताना, मी इतका कमकुवत नाही की मी गोष्टी लीक करेन, असेही म्हणाले. पुढे त्यांना विचारले की, शाहरुख खान आणि आर्यनला एखाद्या पीडिताप्रमाणे भासवण्यासाठी चॅट मुद्दाम लीक केले गेलेले का? यावर बोलताना ते म्हणाले की, “ज्याने कुणी असे केले, मी त्यांना सांगेन की, आणखी जास्त प्रयत्न करा…”

समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते की, आर्यन खानला सोडण्यासाठी त्यांना 25 कोटींची लाच दिली गेली होती. याबाबत बोलताना समीर वानखेडेंनी सर्वच आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, “मी त्याला कधीच सोडलेले नाही, तर मीच त्याला अटक केली होती. अजुनही प्रकरण कोर्टात आहे आणि मला आपल्या न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास आहे.” तसेच, पुढे बोलताना समीर वानखेडेंनी शाहरुख खानसोबतच्या संबंधांबाबत बोलताना सांगितले की, “मी ज्यावेळी मुंबई एअरपोर्टवर डीसीपी होतो, त्यावेळी आमच्यात रिस्पेक्टफुल संबंध होते. तसेच आर्यन खानला त्रास वगैरे देण्यात आला हे म्हटले जात आहे. मी काही कुठल्या लहान मुलाला अटक केली नव्हती. आर्यन खान तेव्हा 23 वर्षांचा होता. 23 व्या वर्षी भगत सिंह यांनी देशासाठी बलिदान दिले होते. तुम्ही त्यांना कोवळ्या वयाचा मुलगा वगैरे म्हणणार का? असा प्रश्न समीर वानखेडे यांनी यावेळी उपस्थित केला

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img