-0.5 C
New York

Sajid Khan : ‘माझी आई म्हणायची की…’; ६ वर्षांनंतर साजिद खानने सोडलं मौन

Published:

२०१८ मध्ये ‘मी टू’मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान यांच्या विरोधात महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपानंतर दिग्दर्शक साजिद खान यांनी गेले सहा वर्ष मौन बाळगले होते. या गंभीर आरोपांमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम देखील झाला होता. ज्यावेळी हे आरोप झाले त्यावेळी ‘हाऊसफूल- ४’या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. त्यामुळे कामावेळी त्यांना वाईट काळाचा सामना करावा लागला होता. अखेर सहा वर्षानंतर दिग्दर्शक साजिद खान यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिग्दर्शक साजिद खान यांनी मुलाखत दिली. त्यावेळी या संपूर्ण प्रकरणावर त्याने उलगडा केला आहे. त्या मुलाखतीत तो म्हणाला,’गेल्या सहा वर्षांत मी अनेकदा माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. हा काळ अत्यंत वाईट होता. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडून (IFTDA) क्लिन चिट मिळाल्यानंतरही माझ्या हाती काम नव्हतं. आता कुठे मी माझ्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. मला माझं घर विकून भाड्याच्या घरात राहावं लागलं, कारण कमाई काहीच नव्हती. माझे वडील कमरान खान यांच्या निधनानंतर मी वयाच्या 14 व्या वर्षापासूनच काम करू लागलो होतो. माझ्यावर आणि बहीण फराह खानवर बरंच कर्ज ठेवून ते गेले होते. आज मी माझ्या पायांवर पुन्हा उभा असल्याचं पाहायला माझी आई जिवंत हवी होती. माझं आयुष्य खूप कठीण होतं.’

Sameer Wankhede : शाहरुख खानसोबतच्या लीक चॅटबाबत काय म्हणाले समीर वानखेडे?

पुढे तो म्हणाला, “. माझ्यासोबत मीडिया ट्रायल झाला होता, पूर्णपणे एकाच बाजूने. मी माझ्या आक्षेपार्ह विनोदासाठी ओळखला जायचो. पण मी कधीच कोणत्या महिलेचा अपमान केला नव्हता आणि करणारही नाही. माझ्या आईने मला स्त्री-पुरुष समानतेची बाब शिकवली. मला माहित नव्हतं की माझ्या शब्दांची किंमत मला इतकी मोठी चुकवावी लागेल.मला बोलायचं नव्हतं. माझी आई म्हणायची की, मौन हे सोन्यासारखं असतं. समज धुक्यासारखी असते, ती साफ करावी लागते.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img