-0.5 C
New York

Kalyan Case : अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणात नराधम पती-पत्नीच्या पोलिस कोठडीत २ दिवसांची वाढ

Published:

प्रातिनिधी शंकर जाधव

डोंबिवली : कल्याण्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपाखाली विशाल गवळी (Vishal Gawali) आणि त्याची पत्नी साक्षी गवळी (Sakshi Gawali) यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली.आहे. गुरुवार 2 तारखेला न्यायालयात दोघांना हजर करण्यात आले. गवळी यांच्या पोलिस कोठडीचा कालावधी आठ दिवसांचा होता, जो संपल्याने पुढील तपासासाठी पोलिसांनी कोठडी वाढवण्याची विनंती केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अजून काही महत्त्वाचे पुरावे गोळा करायचे आहेत. विशालने गुन्ह्याच्या वेळी वापरलेले सीमकार्ड, गटारात फेकलेला मोबाईल आणि खाडीत टाकलेली पिशवी यांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे. तसेच मृत मुलीचा मृतदेह ज्या ठिकाणी फेकण्यात आला होता, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विशाल गवळीच्या वकिलांनी न्यायालयात तक्रार केली की तपास जवळपास पूर्ण झाला आहे आणि पोलिसांना त्याची पुढील चौकशीची गरज नाही. त्यांनी विशालला आणि साक्षीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, पीडित कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार यांनी याला कडाडून विरोध केला. ॲड. नीरज कुमार म्हणाले की, पोलिस तपास अद्याप अपूर्ण असून आरोपींना न्यायालयीन कोठडीत दिल्यास तपासास अडथळा निर्माण होऊ शकतो.

Jitendra Awhad : …तेव्हा लाज वाटली नाही का? आव्हाडांचा नरहरी झिरवाळ यांना सवाल

बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाचा संदर्भ देत आरोपीच्या वकिलांनी अशी भीती व्यक्त केली की विशाल आणि त्याच्या पत्नीला पोलिस चकमकीत ठार मारले जाऊ शकते. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडीत नातेवाईकांच्या संपर्कात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.

या खळबळजनक घटनेनंतर विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांनी न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवला. “विशाल गवळीला फाशी द्या,” अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार केली होती. या साखळीत महिला, पुरुष, युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शांततेत झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण गंभीर झाले होते.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची पहिल्या बैठकीत, शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी न्यायालयाच्या आवारात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. या प्रकरणाने सर्व स्तरांवर संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. न्यायालयीन निर्णय येईपर्यंत आरोपींना पोलिस कोठडीत ठेवून तपास अधिक व्यापक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img