गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रिमंडळाचा (Cabinet Meeting) विस्तार झाल्यानंतर पार पडली. या बैठकीमध्ये सध्याचं राज्यातील वातावरण पाहाता काय निर्णय घेतले जाणार? कोण कोण मंत्री या बैठकीला उपस्थित असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं?उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची या बैठकीला उपस्थिती नव्हती. या बैठकीला मात्र दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. तसेच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाचा आढावा देखील घेण्यात आला आहे.
Cabinet Meeting धनंजय मुंडे यांची उपस्थिती
सरपंच संतोष देशमुख बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. वाल्मिक कराड याच्यावर या प्रकरणी आरोप होत आहेत. वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला, दरम्यान वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे मंत्री धनंजय मुंडे देखील चर्चेत आहेत. विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र धनंजय मुंडे आजच्या बैठकीला यांची उपस्थिती होती.या बैठीकला दुसरीकडे मात्र अजित पवार हे उपस्थित नव्हते. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ही राज्य मंत्रिमंडळाची पहिलीची बैठक होती, मात्र या बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
Cabinet Meeting शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे. राज्यातील 963 शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वर प्रतिक्रिया देताना बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.