-1.8 C
New York

Beed Case Update : मोठी बातमी…वाल्मिक कराड महाराष्ट्रातच ?

Published:

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या चर्चेचा विषय आहे. राज्याचं राजकारण या घटनेच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सातत्याने होत आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंंट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड असल्याचं म्हटलं जातयं. सध्या हत्या प्रकरणी सीआयडीकडून कसून चौकशी सुरु असून याबाबतची मोठी माहिती आता समोर येत आहे.

वाल्मिक कराड याचा शोध घेण्यासाठी सीआयडीचे विशेष पथक रवाना झाले आहे.अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड याचा शोध सुरु असून महाराष्ट्राबाहेर असल्याचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते मात्र, आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातचं मुक्कामी असल्याचं आता समोर येत आहे. आजपासून सीआयडीच्या ४ टीम वाल्मिक कराडचा शोध घेणार आहेत. त्यामुळे आता त्याच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

वाल्मिक कराडच्या पत्नीची देखील चौकशी केली असून अनेक पैलू आता समोर येत आहेत. सीआयडीकडून या प्रकरण खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.. त्यासोबतच वाल्मिक कराडची आणखी कोणत्या बँकेत खाती आहेत, याचाही शोध सुरु आहे.वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत. मुंडे कुटुंबासोबत जवळचे संबंध आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img