अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक (Presidential Election) पार पडली. त्यात रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांचा मोठा विजय झालेला आहे. तरीदेखील त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये आता ट्रम्प यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यांच्यावर पाच दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. अमेरिकीतील एका कोर्टाने हा निर्णय जाहीर केला आहे. यासोबतच कोर्टाने या प्रकरणात ट्रम्प यांना दोषमुक्त करण्यासही नकार दिला आहे.
एडल्ट फिल्म स्टार स्टॉर्मी डेनियल्सशी संबंधित प्रकरणातील खटल्यावर निर्णय देताना अमेरिकेतील न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवले होते. ट्रम्प यांनी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. पुढच्या वर्षातील पहिल्याच महिन्यात म्हणजेच 20 जानेवारी 2025 रोजी ते अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संघीय न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले होते.
या आधी डोनाल्ड ट्रम्प यांना जानेवारी 2024 मध्ये कॅरोल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दुसऱ्या एका खटल्यात न्यायालयाने तब्बल 83.3 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावलेला आहे. त्या निर्णयाच्या विरोधातदेखील डोनाल्ड ट्रम्प याचिका दाखल करणार असल्याचे समोर आले आहे. ‘मी कॅरोलला कधीच भेटलो नाही आणि ती माझ्या टाईपची नाही’, असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरोल यांचे आरोप फेटाळताना केले होते.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 1997 साली दिलेल्या एका निकालानुसार, एखाद्या व्यक्तीला ती राष्ट्राध्यक्षपदी आहे म्हणून गुन्ह्यांच्या खटल्यांपासून त्याला संरक्षण मिळणार नाही, असे म्हंटले होते. त्यामुळे 20 जानेवारी 2025 पासून डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू होणार असला तरी देखील त्यांचा हा खटला न्यायालयात चालणार आहे