-0.6 C
New York

Digital Arrest : ६८ वर्षीय वृद्धासोबत ऑनलाईन स्कॅम, बांधला ‘इतक्या’ लाखांचा गंडा

Published:

वाढत्या गुन्ह्यांची नोद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच मालाड मधील ६८ वर्षीय वयोवृद्धाला डिजिटल अटक करण्यात आल्याचे दाखवत त्याची लाखो रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. डिजिटल अटकेची धमकी देऊन लोकांना फसवल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात आले आहे. आरोपींची नावे समोर आली असून हे आरोपी गुजरात मध्ये सक्रिय असल्याचं म्हटलं जातं होतं.

२१ डिसेंबरच्या सकाळी एका अज्ञात व्यक्तीने ६८ वर्षीय वयोवृद्धांना दूरध्वनी द्वारे पोलिस असल्याचं सांगत कथित फोन केला. संपूर्ण कुटुंबियांची माहिती काढून त्याने त्यांच्या आधारकार्डवरुन गोयल नावे बॅंकेत खाते उघडले. या बॅंक खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगत चौकशीसाठी तुम्हाला पोलिस ठाण्यात यावे लागेल असं सांगितले. त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉल द्वारे डिजिटल अटक केल्याचंस सांगत तुम्हाला कोणाशीही संपर्क साधता येणार नाही असं सांगितले. या प्रकरणातून सुटका करण्यासाठी १० लाखांची मागणी केली. १० लाख रुपया द्यावे लागतील अन्यथा त्यांची घरात येऊन अटक केली जाईल असं सांगण्यात आले.

या प्रकाराने प्रचंड घाबरले आणि आमच्याकडे १० लाख रुपये नसून आठ लाख साठ हजार रुपये असल्याचं सांगितले. आठ लाख साठ हजार रुपये त्यांनी बॅंक खात्यात टाकले.आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला.त्या आरोपींना गुजरातमधील सुरत मधून अटक करुन त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img